जगी सर्व सुखी
जगी सर्व सुखी असा मीच आहे
मनाचे समाधान त्यात ओतले आहे
मनाच्या यातना सर्व सोडून दिल्या
सुख पसारा मना माजी खूप केला //१//
मज सारिखे जीवन नसेल कुणा
पदोपदी भासतात मज त्या खुणा
मज सारिखे मिळोत जगी अनेक
हीच आशा धरून जागतो विवेक //२//
मना सारिखे सुख मानीत जावे
दु:ख अवघे विसरोनिया जावे
मनामाजी सदा सुख आठवावे
तया माणसा कोण दु:खी म्हणावे//३//
जगी जगाया सारेची आले
भव सागरी अवघे मेले
नाही उरला कोणी महंत
मग मजला का बरे खंत//४//
जगी जगाया किती एक येती
नाही तयाची केलीय गिनती
तयामाजी मी एक फुलपाती
देईल मला काळ मूठमाती//५//
खाली हात येतो खाली हात जातो
मधला पसारा कुणास करितो
अनाथासाठी कर हात तू वर
तारेल तुजला स्वये हरिहर //६//
कुणाच्या नावाने करितोस जमा
मरण समई येईल का कामा
जपाचे सामर्थ कलीयुगी थोर
चुकेल जन्म मरणाचा फेर //७//
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७)
(०२२ २७५७६२९१)
निरंतर
तूच माझा पिता तूच माझी माता
राही माझे चित्ता निरंतर //१//
तूच माझा कर्ता तूच दु:ख हर्ता
घेई माझी वार्ता निरंतर//२//
तूच वनमाळी तूच चंद्र मौळी
रक्षी सर्व काळी निरंतर //३//
मी तुझा भाट धरी माझे बोट
डावी मज वाट निरंतर //४//
तू सांब भोळा लागो तुझा लळा
दिसो मज डोळा निरंतर //५//
घर तुझे अंबरी परी वास पंढरी
असो ध्यास अंतरी निरंतर //६//
नित वंदू तुला वाहू बेल फुला
तुळसीची माळा निरंतर //६//
तूच माझा राम तूच माझा शाम
घेतो तुझे नाम निरंतर //७//
हात कटेवरी पाय विटेवरी
कृपा मजवरी निरंतर //८//
022 27576291 भगवान बोधाराम पाटील 9004286917
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा