शेतकरी ओवी
पहिली माझी फेरी ग कपाशीच्या बियाला
लावणी करण्या वाढण्या उत्पन्न
दुसरी माझी फेरी ग हयाब्रीडच्या बियाला
पेरणी करण्या वाढण्या उत्पन्न
तिसरी माझी फेरी ग मिरचीच्या रोपाला
लावणी करण्या वाढण्या उत्पन्न
चवथी माझी फेरी ग ती सूर्य फुलाला
टोचणी करायला वाढण्या उत्पन्न
पाचवी माझी फेरी ग कपाशीच्या पिकला
खुरपणी करायला वाढण्या उत्पन्न
सहावी माझी फेरी ग हयाब्रीडच्या पिकला
सेंद्रिय देण्याला वाढण्या उत्पन्न
सातवी माझी फेरी ग कपाशीच्या बोंडला
वेचणी करायला वाढण्या उत्पन्न
आठवी माझी फेरी ग हयाब्रीडच्या पिकला
खुडणी करायला वाढण्या उत्पन्न
नववी माझी फेरी ग खळ्यावर जाईन
मळणी करीन वाढण्या उत्पन्न
दहावी माझी फेरी ग भ्रताराशी बोलीन
उत्पन्नाचा हिशोभ लिहून ठेवीन
सगळ्या माझ्या फेऱी ग निढळाच्या घामाघ्या
देशाच्या हिताच्या वाढण्या उत्पन्न
भगवान बोधाराम पाटील
९००४२६८९१७ (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा