// शेतकरी दादा//
शेतकरी दादा शेतकरी दादा
शेतात तुमचे पिकतो कांदा
बाजारात नेला अवघा कांदा
भाव नाही पडला बघा वांधा/१/
शेतकरी दादा शेतकरी दादा
शेतात तुमचे पिकते ज्वारी
तीवर जगते दुनिया सारी
परंतु दादा तुजवर उधारी /२/
शेतकरी दादा शेतकरी दादा
शेतात तुमचे पिकते कपाशी
कपाशी पासून बनतो कपडा
शेतकरी दादा राहतो उघडा /३/
शेतकरी दादा शेतकरी दादा
सरकी पासून निघते तेल
तेलाचे भाव गेले आकाशी
तरी बघा शेतकरी दादा उपाशी /४/
शेतकरी दादा शेतकरी दादा
शेतात तुमच्या धान्याच्या राशी
धान्याचे भाव नाही तुझ्या हाताशी
म्हणून शेतकरी दादा घेतो फासी /५/
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा