पाटी
कोरी कोरी छान नवी कोरी छान
बाबा मला एक पाटी आण//धृ //
पाटीवर लिहायला लेखनांची जोडी
लेखनांच्या जोडीला रंगांची पेटी
रंगांच्या पेटीला बोटांची साथ //१// बाबा...
नव्या नव्या पाटीवर अक्षरांच्या ओळी
अक्षरांच्या ओळीला वळणाची जोडी
वळणाच्या जोडीला मोत्याचा साज //२//बाबा..
गणिताच्या तासाची लागली मला गोडी
गोडीला वाढविल हि कोरी कोरी पाटी
शाळेला जायचे हो आहे बाबा आज //३//बाबा..
छोट्याशा पाटीची करामत मोठी
करामत मोठीला बुद्धिची साथ
बुद्धिच्या साथीला गणिताची हाक //४//बाबा..
भगवान बोधाराम पाटील
(९००४२६८९१७) (०२२ २७५७६२९१)
देहाचा नाश
वादाचा वाद धनाचा नाश
पिण्याचा नाद देहाचा नाश
बाईचा नाद जीवनाचा घात
दिव्याची वात प्रकाशाची साथ
दानाचा हात पुण्याची साथ
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा