मनीषा
जीवित कार्य करण्यासाठी जीवित कार्य सरले आता
जन्म घेतला मानवा पोटी नको मज शरीर फ़जीता
सरले कार्य झाली साठी तयार करावी मजला चिता
हवी मजला शव पेटी //१// हेची आस मनात आता //२//
सरले कार्य सरली साठी जीवनाच्या सायंकाळी
हरी नाम यावे मम ओठी आठवावा वनमाली
तोडी सकल संसार गाठी राम म्हणा वेळोवेळी
हेची आशा मज मनी मोठी //३// होईल पापाची होळी /४///
मरणी मरण यावे
जीवन सार्थक व्हावे भगवान बोधाराम पाटील
लवकर मज न्यावे (९००४२८६९१७)
हेची आशा मनोभावे//५// (०२२ २७५७६२९१)
जगी सर्व सुखी
जगी सर्व सुखी असा मीच आहे
मनाचे समाधान त्यात ओतले आहे
मनाच्या यातना सर्व सोडून दिल्या
सुख पसारा मना माजी खूप केला //१//
मज सारिखे जीवन नसेल कुणा
पदोपदी भासतात मज त्या खुणा
मज सारिखे मिळोत जगी अनेक
हीच आशा धरून जागतो विवेक //२//
मना सारिखे सुख मानीत जावे
दु:ख अवघे विसरोनिया जावे
मनामाजी सदा सुख आठवावे
तया माणसा कोण दु:खी म्हणावे//३//
जगी जगाया सारेची आले
भव सागरी अवघे मेले
नाही उरला कोणी महंत
मग मजला का बरे खंत//४//
जगी जगाया किती एक येती
नाही तयाची केलीय गिनती
तयामाजी मी एक फुलपाती
देईल मला काळ मूठमाती//५//
खाली हात येतो खाली हात जातो
मधला पसारा कुणास करितो
अनाथासाठी कर हात तू वर
तारेल तुजला स्वये हरिहर //६//
कुणाच्या नावाने करितोस जमा
मरण समई येईल का कामा
जपाचे सामर्थ कलीयुगी थोर
चुकेल जन्म मरणाचा फेर //७//
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७)
(०२२ २७५७६२९१)
// आशा //
सुंदर धरती वर नभांगण
ढगाळ सुंदर दिसेल जीवन
झरणॆ झरती हिरवी धरती
दिसावी मजला आशा मानसी
भगवान बोधाराम पाटील
०२२ २७५७६२९१ (९००४२८६९१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा