जनता वाढते
माझ्या भारत देशात भारत देशात
जनता वाढते जनता वाढते
गावच्या घर घरात घर घरात
पाळणा हालतो जनता वाढते
रेशन दुकान दारात दुकान दारात
गर्दी वाढते जनता वाढते
बाजार गल्ली बोळात गल्ली बोळात
दुकान वाढते जनता वाढते
नगर शहर शहरात शहर शहरात
झोपडी वाढते जनता वाढते
शाळा शाळा मधला शाळा मधला
प्रवेश वाढतो जनता वाढते
अगिन गाडीच्या डब्यात गाडीच्या डब्यात
गर्दी दाटते जनता वाढते
काळ्या आईच्या कुशीत आईच्या कुशीत
सिमेंट डोलते जनता वाढते
सार्या वाढीच्य गतीने वाढीच्या गतीने
शिवार घटते जनता वाढते
काळ्या आईच्या कुशीत आईच्या कुशीत
तिफन चालवा अनाज वाढवा
दोन पाळण्या मधील पाळण्या मधील
अंतर वाढवा जनता घटवा
भगवान बोधाराम पाटील (९००४२८६९१७)
(०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा