सहजपणे
नको मज मुक्ति घडो तुझी भक्ती
तुझे नाम मुखी सहजपणे
हा माझा विचार तू माझा आधार
तुझा नाम जप सहजपणे
जरी मी पतित धरी माझा हात
घेई मज काखेत सहजपणे
करितो तुझी सेवा देई मज मेवा
पुण्याचा तो ठेवा सहजपणे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
कळो तुझे वर्म सहजपणे
महिमा तुझा अगाध वर्णिती चार वेद
होऊ दे मज बोध सहजपणे
जन्म मरणाचा फेरा मज नको दोबारा
चुकवी बा येरझारा सहजपणे
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९2)
सुनित
इकडे पळतो तिकडे पळतो/ धरणी वरती लोळत राहतो /
कितीही लाथा बसोत शंभर/ तरीही तयाचा पहिला नंबर //
कितीही लाथाडा धावत राहतो / डोक्यावरून उडी पण मारतो /
इकडून मारा तिकडे पळतो / तिकडून मारा इकडे पळतो //
थांब थांब थांबेना पळभर / धाव धावतो मधून भरभर /
पाया खालून जातो हा झरझर / उसंत नाही तयाला पळभर //
असा हा कोण बरे बिलंदर / नाव त्याचे फुटबाल जगभर // भगवानबोधाराम पाटील (९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
सुनित
एक दोन एक दोन
ओळखा पाहू मी कोण /
तीन चार तीन चार
दूरवर मी न फार /
पाच सहा पाच सहा
डोळे भरू भर पहा /
सात आठ सात आठ
पहा माझा थाटमाट /
नऊ दहा नऊ दहा
धाकी माझ्या आहे सहा /
आहे तुमचे देहात
ठेवतो तुलाच धाकात /
षड रिपू माझे हातात
मन माझे नाव झोकात
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
आले आले म्हातारपण
आले आले म्हातारपण डोळे गेले भरकन
आले आले म्हातारपण कान झाले बेईमान
आले आले म्हातारपण गेले सारे शहाणपण
आले आले म्हातारपण पाय करिती कुणकुण
आले आले म्हातारपण देह झाला तीरकमान
आले आले म्हातारपण अंगी आले उदासपण
आले आले म्हातारपण पैशाची झाली चणचण
आले आले म्हातारपण सारे करीती वणवण
आले आले म्हातारपण घरात झाली अडचण
आले आले म्हातारपण मरण देई पटकन
भगवान बोधाराम पाटील (९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
जातक पातक
जन्मा आलो जन्मा आलो रडू जोराने लागलो
माय म्हणे काय झाले दुध पाज बाप बोले//१//
कुणास ना समजले माझे मला उमजले
व्यर्थ आता अडकलो जन्म मरणी जखडलो//2//
मी रडतो जन हसती नच कळे माझी फजिती
लाख चौर्याशीची गिनती कधी चुकेल ती पुरती //३///
मागील जन्माचे पातक आठवे मजला जातक
म्हणून रडतो जोरात कळेल काय? ते लोकास//4//
भगवान बोधाराम पाटील (९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा