// कलियुग हा आला //
विवेक पार मेला
आदर दूर गेला
नच दोष कुणाला
कली युग हा आला
घरातली गादी पडवीत आली
पडवीतून ती पारावर गेली
घरातली ऊब आठवण आली
पारावर डासांची संगत झाली
राजे गेले होते वनात
मला वाटे जावे वनात
त्राण नाही आता कायेत
कशी चालू मी वन वाट
नच दोष हा कुणाला
कली युगी घात केला
कळीची महिमा मोठी
कुटुंबात आली तृटी
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा