आनंदे परीक्षा देऊ
रोजचा अभ्यास करू आनंदे परीक्षा देऊ
उद्याच्या वर्गाला उद्याचे तासाला
नवीन विषय घेऊ आनंदे परीक्षा देऊ //धृ //
कठीण विषय मोठा होईल सुगम आता
विषय वर्गांचे अनेक भाषांचे
रोजच आपण धेऊ आनंदे परीक्षा देऊ//१//
वाईट विचार सांडू सुंदर विचार मांडू
मराठी गणित हिंदीचे वाचन
रोजच आपण घेऊ आनंदे परीक्षा देऊ //२//
नविन कल्पना शोधू गणित भूगोल पाहू
नविन सिद्धांत विज्ञान रूपाने
आपण शोधून काढू आनंदे परीक्षा देऊ //३// चंद्राला जवळ करू सूर्याची उष्णता ओढू
विश्वाचे आंगण जगाचे घरकुल
आपण करून सोडू आनंदे परीक्षा देऊ //४//
रोगाचे निदान करू मानवी आयुष्य वर्धू
विविध यंत्राने अनेक तंत्राने
सुखाचा संसार करू आनंदे परीक्षा देऊ //५//
संगणक हाती घेऊ वेळेची बचत करू
विशाल कामाचे विविध रूपाने
नियोजन मग करू आनंदे परीक्षा देऊ //६//
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७)
(022 27576291)
आज निकाल आला
(चाल--किती सागू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला )
चला वाचू या बघू या पेपर आज निका निकाल आला
पेढा खाऊ चला गुण विचारू चला पास झाला ग झाला ग झाला ///धृ //
परीक्षेच्या दिशी ग मनी प्रश्न दाटी पेपर फडफडले
प्रश्न वाची मनात पेन धरी हातात उत्तर लिहीलीहिले
अभ्य्सा केला उठून रोज रात्री जागून
नव्या गणिताचा अभ्यास केला //१//
स्फूर्ति अशी घेतली ग कधी ना ती विसरी वदले गुरु महंती
कधी करी संवाद कधी करी भाषण बोलण्या वेळ किती
रोज खेळ खेळून नाच गाणे म्हणून
रोज सकाळी अभ्यास केला //२//
पेपर असा लिहिलारे तपासनीस गुंगला गुणावारी गुण पडे
मधून मधून किती तरी करितो खुणा जरी गुणांचे भरती घडे
निकाल आहे कसा ? सांग म्हणे मला
एक नंबरचा मेरीट आला //३//
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
(९००४२८६९१७)
nice poem.
उत्तर द्याहटवा