जिकडे जातो तिकडे येते
मागे पुढे फिरत राहते
अंगाला ती धरून चालते
विरह माझा ती न करते //१//
सूर्य साक्षीने मला भेटते
अंग अंगाला प्रेमे धरते
रात होताच पळून जाते
विरह तिचा मला कळतो //२//
सकाळी लांब लांब दिसते
दुपारी ती आखडून जाते
सांज वेळी ती लांब दिसते
बया माझे मागेच लागते//३//
अशी ही कोण मला गावली
माझीच बरे का ती सावली//
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा