मनोगत
माझीया मताने मी नाही लिहीत //
लिहविता धनी उभा पंढरीत //
मी पामर काय करील कविता //
गुरु गणेश बसला बुद्धी दाता //
कोकिळेचा आवाज किती मधुर //
उगम तयाचा करितो श्रीधर //
मी लिहितो कवितावली अखंड //
मजवरी तयाची कृपा उदंड // दास
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
मन
मना सारीखा थोर नाही जगी /
मना सारीखा चोर नाही जगी //
मना सारीखा विकारी नाही जगी /
विचार तयाचा केला नाही कधी //१ //
वाईट शोधण्या जगी हिंडलो /
शोधता शोधता बहू थकलो //
स्वताचे मनी मग मी शिरलो /
मज सारीखा वाईट मी जगी एकलो // २//
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७) (०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा