जगाच्या नाशाला अतिरेकी संघ
घडविती स्फोट देशो देशी
नानाविध जीवांचा होतसे अंत
करूनi तयाची नसे तया
स्फोटा स्फोटा मूळे जळताती घरे
बघवेना डोळा दु:ख भारी
ताटातुट होई तान्हुल्या बाळाची
आईची ममता हारपली
बोलू गेले जाता प्राणाची आहुती
स्फोटाचे होमात होत असे
अतिरेकी संघ कोण बनवितो
जाणते जनता मुक मने
जनतेचे मौन अतिरेकी वाढ
चारी दिशा वाव अतिरेक्याशी
अतिरेकी बीज समाजी रुजते
खत पाणी तया कोण देते ?
अतिरेकी बीज पाण्याविण अंकुरे
फोफावते झाड अधां तरी
अतिरेकी झाडा आधार कोणाचा
जाणते जनता डोळे मिटूनी
भगवान बोधाराम पाटील
(९००४२८६९१७)(०२२ २७५७६२९१)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा