उठ मानवा ऊठ
ऊठ मानवा ऊठ कराया संग्राम तू ऊठ
तुझिया अंतरी यम शिरतो कराया लुट
मन शस्त्राला पाजळून हातात धरी नीट
पुण्य रथाला भजन तापाचे हय जूप नीट
बल शक्तीच्या चक्राला तू पुण्य रथाला जोड
एकाग्रतेचा चाबूक घेऊन हाक त्वरेने नीट
सज्ज करी ज्ञानं धनुला बाण भक्तीचे जोड
विस्वासाच्या भात्या मधुनी बाण भक्तीचे सोड
लक्ष्यावर ध्यान ठेउनी बाण भक्तीचे सोड
लाखो यम येतील शरण तुला मानवा ऊठ
भगवान बोधाराम पाटील ९००४२८६९१७
(०२२ २७५७६२९१)
साक्षरता
पहिली माझी फेरी ग गावाच्या कुसाला
नोंदण्या करण्या करण्या साक्षर
दुसरी माझी फेरी ग गावाच्या घराला
माहिती काढण्या करण्या साक्षर
तिसरी माझी फेरी ग निरक्षर शोधीन
नोंदणी करीन करण्या साक्षर
चवथी माझी फेरी ग निरक्षर जमवीन
शाळा हि भरवीन करण्या साक्षर
पाचवी माझी फेरी ग फळ्यावर लिहीन
अ आ ई गिरवीन करण्या साक्षर
सगळ्या माझ्या फेर्या ग पोट तीडकेच्या
देशाच्या हिताच्या करण्या साक्षर //
भगवान बोधाराम पाटील (९००४२८६९१७) ०२२ २७५७६२९१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा