हुंडा
हुंडा देऊन नोवरी केली
वाजत गाजत सासरी गेली
दोन वर्षाची वेळ नाही गेली
तिला माहेरी आणून दिली //१//
उभ्या जीवनाची झाली हो होळी
लेक पारखी घराला झाली
दोन जीवांची करून होळी
तिला माहेरी आणून दिली //२//
साडी हळदीची नेसून गेली
नवरा बायकोला टाकून बोली
नाही बापाने गाडी घेऊन दिली घेऊन गाडी बापाने नाही दिली
तिला माहेरी आणून दिली //३//
हुंड्या गुंड्याने करामत केली
नवरा बायकोची सांगत गेली
माय लेकरा पारखी झाली
तिला माहेरी आणून दिली //४//
हुंडा घेण्याचे करू नका पाप
किती जनांची उडाली हो झोप
विचार करण्याची वेळ हि अनमोल
तिला सासरी नांदवा डामाडोल//५//
भगवान बोधाराम पाटील (०२२ २७५७६२९१)
९००४२८६९१७
Bahut khub
उत्तर द्याहटवा